citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरातील Empress Mall मध्ये १२वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट

नागपूरमधील Empress Mall येथे १२वीच्या विद्यार्थ्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यश सुनील झाडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो Dhantoli National College मध्ये बारावीचा विद्यार्थी होता. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


नागपूर शहरातील जवाहरनगर मानवाडा परिसरातील रहिवासी यश सुनील झाडे हा बारावीचा विद्यार्थी होता. तो Dhantoli National College येथे शिक्षण घेत होता.

१४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे दोन वाजता आयआयटीचा पेपर असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. मात्र प्रत्यक्षात आयआयटीचा पेपर १३ मार्च रोजीच झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, तो नागपूरमधील Empress Mall येथे गेला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मॉलच्या वरच्या छतावरून दुसऱ्या छतावर उडी घेत त्याने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्यार्थ्याने आयआयटीची परीक्षा दिली होती, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे.

त्यामुळे १४ मार्च रोजी त्याच्या मनात नेमके काय सुरू होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


एका होतकरू विद्यार्थ्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. या घटनेमुळे कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांचा तपास सुरू असून पुढील माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button