AmravatiCrime NewsLatest News

अमरावतीत मुंबईचा MD ड्रग्सचा आरोपी अटकेत

अमरावतीमध्ये ड्रग्सविरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईहून अमरावतीत एमडी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या आरोपीसह स्थानिक साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ७६ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली असून या प्रकरणात मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शनिवार सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, मुंबई येथील आरोपी मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम हा बडनेरा येथे ड्रग्स विक्रीसाठी येणार आहे. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा येथील नविवस्ती परिसरातील विश्रामगृह परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान अमरावतीतील छाया नगर येथे राहणारा सोहेल खान फिरोज खान याचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे.

दोन्ही आरोपींकडून तब्बल ७६ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली आहे. तसेच या कारवाईतून मोठं ड्रग्स रॅकेट उघड होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील सुकळी परिसरातही कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला होता. मात्र त्या प्रकरणातील आरोपी आणि आताच्या कारवाईतील आरोपी यांच्यात सध्या तरी थेट संबंध दिसून आलेला नाही. सुकळी परिसरातील कारवाईचा सखोल तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, तसेच अमरावती शहर ड्रग्समुक्त करण्यासाठी पोलिसांचा निर्धार असल्याचेही पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितले.

अमरावतीमध्ये ड्रग्सविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button