City CrimecitynewsCrime NewsJalgaonLatest NewsMaharashtra

रावेर तालुक्यात बेकायदेशीर मांस विक्रीवर पोलिसांची धाड; पिता-पुत्रासह तिघे अटकेत

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांवर धाड टाकली आहे. या कारवाईत पिता-पुत्रासह तिघांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मांस आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.


जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ला येथे बेकायदेशीरपणे मांस विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळी रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी अचानक छापा टाकला.

या छाप्यामध्ये शेख युसुफ शेख अय्युब कुरेशी (वय ५०) आणि त्यांचा मुलगा शेख सानिफ शेख युसुफ कुरेशी (वय २५) हे दोघे मांस विक्री करताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून सुमारे २६ हजार रुपये किमतीचे मांस आणि एक धारदार कोयता जप्त केला.

तसेच जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शेख नईम शेख अय्युब कुरेशी हा देखील मांस विक्री करताना आढळला. त्या ठिकाणाहून सुमारे ५ हजार रुपये किमतीचे मांस आणि एक धारदार कोयता पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.


रावेर तालुक्यातील या कारवाईमुळे बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या अवैध व्यवहारांवर पुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button