Accident NewsAmaravti GraminAmravaticitynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

धामणगाव रेल्वे मार्गावर अपघात; धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

धामणगाव रेल्वे मार्गावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध रेल्वे पोलिसांकडून घेतला जात आहे.


धामणगाव रेल्वे मार्गावरील तळणी रेल्वे स्थानकाजवळ एका अनोळखी इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १० मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तळणी रेल्वे स्थानकाजवळ किलोमीटर क्रमांक ७१८/२७ दरम्यान अंदाजे ५० वर्षीय अनोळखी इसम धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस स्टेशन बडनेरा येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न रेल्वे पोलिसांकडून सुरू आहेत.

मृत इसमाचे वर्णन असे की, वय अंदाजे ५० वर्षे, उंची सुमारे ५ फूट ६ इंच, चेहरा लांबट, डोक्यावर कुरळे पांढरे केस आणि रंग सावळा आहे. अंगावर निळ्या रंगाची पॅन्ट, पांढऱ्या-गुलाबी रंगाची टी-शर्ट आणि क्रीम रंगाचा बेल्ट असा त्याचा पोशाख आहे.

या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याचे नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी असल्यास त्यांनी लोहमार्ग पोलीस स्टेशन बडनेरा येथे किंवा डब्ल्यूएचसी गीता नागदेवे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.


दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button