citynewsEducation NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

खाकीतली माणुसकी! नागपुरातील महिला पोलिसाने वृद्धाला दिला आधार; नागरिकांकडून कौतुक

पोलिसांबद्दल अनेकदा कठोरतेची प्रतिमा समोर येते. मात्र कधी कधी खाकी वर्दीतली माणुसकीही मन जिंकून जाते. नागपुरात अशाच एका महिला पोलिसाने एका वृद्ध व्यक्तीला मदतीचा हात देत माणुसकीचे सुंदर उदाहरण घालून दिले आहे. लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये “खाकीतही देव माणूस असतो” अशी भावना व्यक्त होत आहे.


ही घटना नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशन येथे घडली. १३ मार्च रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एक वृद्ध गृहस्थ आपल्या तक्रारीसंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये आले होते.

वय वाढल्यामुळे आणि अशक्तपणामुळे त्यांना चालताना मोठी अडचण होत होती. आपले काम पूर्ण झाल्यानंतर पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना आणि पुढे जाण्यासाठी त्यांना त्रास होत असल्याचे तेथील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले.

यानंतर त्या महिला पोलिसाने क्षणाचाही विलंब न करता पुढे येत त्या वृद्ध व्यक्तीचा हात धरला आणि त्यांना आधार देत सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवले.

या छोट्याशा मदतीमुळे त्या वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. तसेच उपस्थित नागरिकांनीही या कृतीचे मनापासून कौतुक केले.

या घटनेमुळे पोलिसांचे “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य तर अधोरेखित झालेच, पण त्याचबरोबर खाकी वर्दीतही माणुसकी जिवंत असल्याचे सुंदर उदाहरण नागपूरकरांना पाहायला मिळाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button