Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

बडनेऱ्यात गॅस सिलिंडर टंचाई; एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुकिंग नंबर उपलब्ध नसल्याने गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही ठिकाणी पोलिसांच्या उपस्थितीतच गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा शहरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ऑनलाईन बुकिंग नंबर उपलब्ध नसल्याने नागरिकांना थेट गॅस एजन्सीसमोर जाऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. सकाळपासूनच महिला, वृद्ध तसेच कामगार वर्गातील नागरिक गॅस एजन्सीबाहेर तासन्तास रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांच्या उपस्थितीतच गॅस सिलिंडरचे वितरण केले जात आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दखल राज्याचे मंत्री Chandrashekhar Bawankule यांनी घेतली आहे. त्यांनी सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना गॅस वितरण प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

अनेक हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याचे सांगत घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेल्स आणि आस्थापनांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button