citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

पुसदमध्ये अवैध गॅस साठ्यावर कारवाई; घरातून ४० सिलेंडर जप्त

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात अवैध गॅस साठ्याविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. नूर कॉलनी परिसरातील एका घरातून तब्बल ४० घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत हा अवैध साठा उघडकीस आणला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबी पथक आणि पुरवठा विभागाने नूर कॉलनी परिसरात छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरिफ मोहम्मद कच्ची (वय ६२) यांच्या घराची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान घरात अवैधरित्या साठवून ठेवलेले तब्बल ४० घरगुती गॅस सिलेंडर आढळून आले. पोलिस आणि पुरवठा विभागाने हे सर्व सिलेंडर जप्त केले आहेत. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा आणि संभाव्य काळाबाजार रोखण्यासाठी अशा संयुक्त कारवाया पुढेही सुरू राहतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button