Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूर–जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक जखमी

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात देवलापार पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी (१२ मार्च) सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर मौजा चोरबाहुली शिवारात सकाळी सुमारे ७.४० ते ८.१५ वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. एमपी-२२-झेडजी-०७२८ क्रमांकाची मोटारसायकल चालवत विजय भिमराव गेडाम (वय २३) हा जबलपूरकडून नागपूरकडे येत होता. त्याच्या मोटारसायकलवर इंद्रकुमार भालेकर (वय ५०) हे मागे बसले होते.

दरम्यान, चोरबाहुली शिवारात समोर जाणाऱ्या कंटेनरला डिव्हायडरच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना मोटारसायकलचा कंटेनरला धक्का लागला. या धडकेत मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही रस्त्यावर कोसळले.

या अपघातात चालक विजय गेडाम याच्या डोक्याला व उजव्या हाताला दुखापत झाली, तर मागे बसलेले इंद्रकुमार भालेकर हे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील कर्मचारी डॉ. लखन हनवत, प्रवीण ठाकूर आणि नितेश नेवारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना देवलापार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान इंद्रकुमार भालेकर यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी देवलापार पोलीस ठाण्यात मोटारसायकल चालक विजय गेडाम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button