citynewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsNandedpolitics

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध

महाराष्ट्रातील नांदेड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अमर साबळे यांच्यावर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात एकत्र आले आणि त्यांनी अमर साबळे यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, देशभरात निर्माण झालेला गॅस सिलेंडर तुटवडा आणि वाढती महागाई याविरोधातही आंदोलकांनी संताप व्यक्त केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अविनाश भोसीकर यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर टीका केली.

“देशात सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा. तसेच आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” अशी प्रतिक्रिया अविनाश भोसीकर यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button