Amaravti GraminAmravatiAmravatiamravatinewscitynewsDaryapurLatest NewsMaharashtra

दर्यापूरजवळ एसटी बसला अचानक आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

अमरावती :
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे अकोटवरून दर्यापूर आगाराकडे येत असलेल्या एसटी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना दर्यापूर येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक MH 09 E 2260 असलेल्या या बसला अचानक आग लागल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. बसमधून धूर निघू लागल्याचे पाहताच चालक आणि प्रवाशांनी तत्काळ सतर्कता दाखवत बसमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली.

आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, उन्हाळा सुरू होताच परिवहन विभागाच्या वाहनांच्या देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button