जागतिक महिला दिनानिमित्त अमरावतीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अमरावती शहरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षिका कीर्तिताई चिंतामणी आणि सामाजिक कार्यकर्त्या तसेच नगरसेविका ॲड. प्रितीताई रेवणे यांचा गौरव करण्यात आला.
अभिनंदन पेंढारी मित्र मंडळ आणि दिगंबर जैन महासमिती यांच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात कीर्तिताई चिंतामणी आणि ॲड. प्रितीताई रेवणे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन दिगंबर जैन महासमितीचे विदर्भ अध्यक्ष अभिनंदन पेंढारी यांनी केले होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्त्री शक्तीचे महत्त्व अधोरेखित करत महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले आणि सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



