वाघोड येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२९ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन

Raver तालुक्यातील Waghod येथे क्रांतिज्योती Savitribai Phule यांच्या १२९ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. श्री संत सावता चौकातील माळी भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात Jyotirao Phule आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका सौ. मधुमती महाजन, माजी सरपंच वंदना पाटील, किर्ती चौधरी आणि शालेय विद्यार्थिनी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका सौ. मधुमती महाजन यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी अपमान, उपहास आणि सामाजिक बहिष्कार सहन करत शिक्षणाची ज्योत पेटती ठेवली. त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि स्त्रीदास्यतेविरोधात लढणाऱ्या क्रांतिकारक होत्या, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मनोगत व विचार मांडून सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर सातव सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रामकृष्ण महाजन यांनी मानले.
या कार्यक्रमाला माजी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुनील पाटील, माळी समाज अध्यक्ष सुनील चौधरी, भारत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आय. एस. पाटील, विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष संतोष महाराज, सुधाकर महाजन तसेच माळी समाज पंच मंडळ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



