Amaravti GraminAmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

बडनेरा येथे ४५ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळला; हत्येची शक्यता

बडनेरा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून बडनेरा–अंजनगाव बारी रस्त्यालगत एका ४५ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणात हत्या झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायसोनी कॉलेजसमोर सेंट पीटर स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतकाचे नाव Suraj Kusu Yadav असे असून तो Jabalpur जिल्ह्यातील सिकारा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुरज यादव हा वीटभट्टी कारखान्यावर मजुरी करत होता आणि मसला परिसरात राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मृतकाच्या डोक्यावर दगडाने मारल्याच्या जखमा दिसून आल्या असून बाजूलाच रक्तबंबाळ दगडही आढळून आला आहे. त्यामुळे ही हत्या असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी बडनेरा पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गीते करत आहेत.

दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button