Crime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये घरफोडी प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावला आहे. चोरीला गेलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर नगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा गिट्टीखदान पोलिसांनी जलदगतीने तपास करत उलगडा केला. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेले सुमारे १० तोळे सोने आणि १ लाख ५० हजार रुपये रोख असा मुद्देमाल अवघ्या ४८ तासांत हस्तगत केला.

या प्रकरणात एकूण सुमारे १३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून तो मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त किरण पोपळघट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या तपासात पोलीस कर्मचारी मोहर, प्रमोद सहारे, करिश्मा यादव आणि आरती यादव यांनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, फिर्यादीने पोलिसांच्या जलद कारवाईचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले आहे. 🚓

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button