इराण-इस्रायल संघर्षाच्या झळा महाराष्ट्रात; गॅस सिलिंडरचा तुटवडा, एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा

महाराष्ट्रा राज्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. West Asia मध्ये सुरू असलेल्या Iran–Israel conflict च्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर गर्दी केली आहे. काही भागात नागरिकांना सिलिंडर मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.
दरम्यान, या परिस्थितीमुळे घरगुती वापरासाठी गॅस मिळण्यात उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यास त्याचा थेट परिणाम भारतातील एलपीजी वितरण व्यवस्थेवरही होऊ शकतो. त्यामुळे परिस्थिती सामान्य होईपर्यंत नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.



