Crime NewsLatest NewsMaharashtraNanded

‘मी मारणे गँगचा शार्प शूटर’ म्हणत बॉम्बस्फोटाची खोटी धमकी; आरोपीला पोलिसांकडून अटक

नांदेड: नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “मी मारणे गँगचा शार्प शूटर आहे आणि नांदेड बसस्थानकावर बॉम्बस्फोट होणार आहे,” असा खळबळजनक फोन करून पोलिसांची झोप उडवणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. एका बनावट फोनमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. मात्र सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीचा माग काढत त्याला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, Nanded येथील पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘मारणे गँगचा शार्प शूटर’ असल्याचे सांगत बसस्थानकातील तक्रार पेटीत बॉम्बस्फोटाबाबतची चिठ्ठी ठेवल्याचा दावा केला. या फोननंतर पोलिसांनी तात्काळ बसस्थानक परिसरात धाव घेत तपास सुरू केला. तेथे धमकीची चिठ्ठी आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान, Wazirabad Police Station पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला. तपासात हा फोन Ambajogai येथून आल्याचे समोर आले. चौकशीत धक्कादायक बाब उघडकीस आली की, आरोपीने एका पाणीपुरी विक्रेत्याकडून “महत्त्वाचा फोन करायचा आहे” असे सांगून मोबाईल घेतला आणि ही खोटी धमकी दिली.

पोलिसांनी मिळालेल्या वर्णनाच्या आधारे अंबाजोगाईतील मनियार गल्ली परिसरातून ३५ वर्षीय शेख सलीम शेख चांदपाशा याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपला गुन्हा मान्य केला असून पोलिस आता या कृत्यामागील नेमका हेतू काय होता याचा तपास करत आहेत.


केवळ प्रसिद्धीसाठी किंवा खोडसाळपणातून दिलेली ही खोटी धमकी पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरली. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून अशा खोडसाळ प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button