AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

बडनेरा पोलिसांकडून बेघर नागरिकांसोबत रंगांची होळी; मानवतेचा अनोखा संदेश

कर्तव्याच्या धावपळीतही वेळ काढत Badnera पोलिसांनी बेघर आणि पीडित नागरिकांसोबत रंगांची होळी साजरी केली आहे. बडनेरा येथील Aadhar Beghar Nivara Kendra येथे हा उपक्रम पार पडला असून पोलिसांच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Amravatiच्या बडनेरा परिसरातील आधार बेघर निवारा केंद्रात यंदाची होळी थोडी वेगळी आणि खास ठरली. बडनेरा पोलिसांनी आपल्या व्यस्त कर्तव्याच्या वेळेतून वेळ काढत बेघर आणि गरजू नागरिकांसोबत रंगांची उधळण करत होळी साजरी केली.

होळीच्या सणासोबतच International Women’s Day चे औचित्य साधत बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी आधार बेघर निवारा केंद्रात पोहोचले. यावेळी त्यांनी तेथील रहिवाशांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला.

रंगांची उधळण, डिजेच्या तालावर नाचत आनंद व्यक्त करणे आणि मिठाई व अल्पोपहाराचे वाटप अशा उत्साही वातावरणात बेघर नागरिकांनीही होळीचा आनंद मनमुराद लुटला. विशेष म्हणजे निवारा केंद्रातील महिलांना गुलाब पुष्प देत पोलिसांनी महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

पोलिसांचे हे संवेदनशील आणि माणुसकी जपणारे रूप पाहून निवारा केंद्रातील रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. या उपक्रमातून पोलिसांनी समाजाला एक सकारात्मक संदेश दिला आहे की — पोलीस फक्त कायदा आणि सुव्यवस्था राखणारे नसून समाजाशी नातं जपणारे संवेदनशील मित्रही आहेत.


बडनेरा पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमामुळे समाजात पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. बेघर आणि गरजू नागरिकांसोबत सण साजरा करून पोलिसांनी खऱ्या अर्थाने माणुसकीचा रंग उधळला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button