AmravatiLatest News

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवप्रेमी आणि शिवसैनिकांच्या पुढाकारातून गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण गाव भगवेमय झाले होते.

भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात शिवसेना शाखा गौरखेडा आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावामध्ये सर्वत्र भगवे झेंडे आणि तोरण लावून वातावरण भगवेमय करण्यात आले होते.
शिवाजी चौकातील शिवस्तंभाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक झाकी, मावळ्यांची झाकी, तसेच अमरावती येथील माऊली गीत गंगा संच यांची भजनांची दिंडी सहभागी झाली होती. मिरवणुकीदरम्यान जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांनी वातावरण भारावून गेले होते.

गावातील सर्व रस्त्यांची स्वच्छता करून सुंदर रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. गावातील महिला, तरुण मंडळ, शिवसैनिक, शिवसेना महिला आघाडी तसेच शारदा माता महिला भजन मंडळ यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. गौरखेडा गावात शिवजयंती सोहळा आणि मिरवणूक काढण्याची परंपरा गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू आहे, आणि ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात कायम ठेवली जात आहे.

गौरखेडा गावात गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू असलेली शिवजयंतीची परंपरा आजही तितक्याच उत्साहात आणि एकोप्याने साजरी होताना दिसत आहे.
जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात हा सोहळा पार पडला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button