India NewsLatest News

होळीच्या आनंदात दुर्दैवी घटना! भोपाळमध्ये भांग मिसळलेले दूध पिल्याने तरुण प्राध्यापकाचा मृत्यू

होळीचा सण नुकताच पार पडला असताना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांग मिसळलेले दूध पिल्याने एका तरुण प्राध्यापकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भोपाळ शहरातील ऐशबाग परिसरात घडली. कृष्णा नायक (वय २५) असे मृत प्राध्यापकाचे नाव असून ते एका खाजगी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. होळीच्या दिवशी त्यांनी मित्रांसोबत रंगांची उधळण करत सण साजरा केला. त्यानंतर त्यांनी एका लिटर दुधात भांगेच्या सहा गोळ्या मिसळून ते दूध पिल्याचे सांगितले जात आहे.

दूध पिल्यानंतर कृष्णा नायक मित्रांसोबत नाचत होते. मात्र काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि नाचत असताना ते खाली कोसळले. मित्रांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. गुरुवारी शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button