citynewsLatest NewsMaharashtraNanded

भुरभुशी येथे मध्यरात्री भीषण आग; काळेकर कुटुंबाचा संसार राख, वासरेही भाजली

भोकर (प्रतिनिधी) :
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भुरभुशी गावात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबाचा संसार अक्षरशः राख झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आडेलु पोताजी काळेकर यांच्या घराला मध्यरात्री अचानक आग लागली. सुरुवातीला आग कशी लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या.

आग लागल्याची माहिती मिळताच गावातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे प्रमाण मोठे असल्याने घरातील बहुतांश साहित्य आगीत जळून गेले.

दरम्यान, घराजवळ बांधलेली छोटी वासरेही आगीत भाजल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे काळेकर कुटुंबाचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून ग्रामस्थांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button