Accident NewsAkolaDaryapurLatest NewsMaharashtra

दर्यापूर–अकोला महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

दर्यापूर (प्रतिनिधी) :
दर्यापूर–अकोला महामार्गावर बुधवारी रात्री भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. गोळेगाव स्टॉपजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनामध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गोळेगाव स्टॉपजवळ हा अपघात झाला. या अपघातात सचिन सोळंके हा तरुण गंभीर जखमी झाला. अपघात इतका भीषण होता की त्याचा हात आणि पाय गंभीर जखमी अवस्थेत होते आणि तो रस्त्यावर पडलेला होता.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गोपाल पाटील अरबट यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोणताही विलंब न करता जखमी सचिन सोळंके याला स्वतःच्या चारचाकी वाहनाने उपजिल्हा सामान्य रुग्णालय, दर्यापूर येथे दाखल केले.

रुग्णालयात डॉ. कोरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमीवर तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र अपघातात हात आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे हलविण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button