Accident NewsCity CrimeLatest NewsMaharashtra

शेगावहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला वरवंडजवळ अपघात; एक जखमी

शेगाव/मेहकर (प्रतिनिधी): श्री संत गजानन महाराज मंदिर येथे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला वरवंड गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथील आठ जणांचे कुटुंब दर्शनासाठी शेगाव येथे आले होते. दुपारी सुमारे चारच्या सुमारास परतीच्या प्रवासादरम्यान वरवंड गावाजवळ अचानक ‘रोही’ (नीलगाय) कारसमोर आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि अर्टिगा कारचा अपघात झाला.

या अपघातात शेखर देशपांडे हे जखमी झाले असून त्यांना जानेफळ येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

दरम्यान, संजय रायमुलकर यांनी घटनास्थळी थांबून जखमींना मदत केली तसेच पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button