विद्यापीठात 6 मार्च रोजी एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

अमरावती (दि. 02.03.2026) : – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग आणि नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आर्थिक दृष्टिकोन : आधुनिक भारताची निर्मिती आणि त्याची समकालीन प्रासंगिकता’ या विषयावर दि. 6 मार्च, 2026 रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र सभागृह येथे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून या चर्चासत्रात नामवंत विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधुनिक भारत उभारणीतील योगदानावर प्रकाश टाकतील.
चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यापीठ, महू चे कुलगुरू डॉ. रामदास आत्राम यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे भूषवतील. प्रमुख अतिथी म्हणून आमदार तथा श्री गजानन महाराज शिक्षण संस्था, अमरावतीचे संचालक श्री रवि राणा, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.आर.डी. सिकची व श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. आशिष मालू उपस्थित राहतील. याप्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ.जे.व्ही. पवार हे बीजभाषण करतील.
पहिल्या सत्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक-आर्थिक तत्त्वज्ञान आणि आधुनिक भारताची निर्मिती’ या विषयावर हैदराबाद विद्यापीठ येथील डॉ. नितीन तागडे व मुंबई विद्यापीठ येथील डॉ. संदेश वाघ हे मार्गदर्शन करतील. सत्राचे अध्यक्षस्थान आर.ए. महाविद्यालय, वाशिमचे डॉ. अनिल बनसोड भूषवतील. दुसया सत्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आर्थिक दृष्टिकोन : समकालीन आव्हाने आणि धोरणात्मक दृष्टीकोन’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर येथील डॉ. गौतम कांबळे आणि सिताबाई कला महाविद्यालय, अकोला येथील डॉ. प्रसेनजित गवई मार्गदर्शन करतील. सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ. विजय वाकोडे भूषवतील.
तांत्रिक सत्रात ‘शोधनिबंध सादरीकरण’ होईल. याप्रसंगी विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नामदेव ढाले, मुंबई विद्यापीठ येथील डॉ. अनघा कांबळे, विद्यापीठ विद्या परिषद सदस्य डॉ. अरुणा वाडेकर, माजी परीक्षा नियंत्रक डॉ.बी.आर. वाघमारे व आंबेडकरी विचारवंत डॉ. वामन गवई उपस्थित राहतील.
समारोप
दुपारी 4 वाजता समारोपीय सत्र संपन्न होणार असून सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे भूषवतील. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रविण रघुवंशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष अॅड. डोळेंद्र पाटील, नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेराचे प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे व साठे महाविद्यालय, विलेपार्ले, मुंबई येथील डॉ. प्रतिभा कांबळे उपस्थित राहतील.
तरी आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राला सर्वांनी मोठ¬ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे व डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी केले आहे.



