विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

आधुनिक मटेरियल सायन्सवरील मार्गदर्शनाने विद्याथ्र्यांना संशोधनाची प्रेरणा
अमरावती (दि. 02.03.2026) :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे, संशोधनाची प्रेरणा देणे आणि विद्याथ्र्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे, प्रमुख अतिथी म्हणून विनायक विज्ञान महाविद्यालय येथील डॉ. प्रशांत खरात, डॉ. जी. जी. मुळे उपस्थित होते.
डॉ. प्रशांत खरात यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना धातु विज्ञान ऑफ मॉडर्न मटेरियल सायन्स या विषयावर सविस्तर माहिती दिली. आधुनिक पदार्थविज्ञान, नॅनो-मटेरियल्स, औद्योगिक उपयोग आणि भविष्यातील तंत्रज्ञान विकासामध्ये धातु विज्ञानाची भूमिका यावर सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. संदीप वाघुळे यांनी भारताला पहिले नोबेल पारितोषिक हे सर सी. व्ही. रमण यांच्या संशोधनामुळे मिळाले असून विज्ञान क्षेत्रात भारतीय संशोधकांची परंपरा अत्यंत समृध्द आहे. भौतिकशास्त्र विषयामध्ये संशोधन, उद्योग, तंत्रज्ञान, डेटा सायन्स आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. भौतिकशास्त्र हा केवळ सैद्धांतिक विषय नसून रोजगाराभिमुख विषय असून विभागातील अनेक माजी विद्यार्थी आज विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. विभागातील प्राध्यापकांनीही शिक्षणाचे बदलते स्वरुप, संशोधनातील संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानातील भौतिकशास्त्राचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्याथ्र्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारताचे महान वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. फिजिक्स क्लबच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. फिजिक्स क्लबचे अध्यक्ष आदित्य प्रधान यांनी मनोगत व्यक्त करून प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कु. चंदन बावनकर, तर आभार श्री सार्थक गाडगे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ¬ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



