Latest NewsMaharashtraNagpur

बेलतरोडीतील घरफोडीचा छडा; मुख्य आरोपी अटकेत, २.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर: नागपूर शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बेलतरोडी परिसरातील मोठ्या घरफोडीचा अखेर छडा लागला आहे. नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ने तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


१ मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट १ ने बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीचा छडा लावला.

या कारवाईत पोलिसांनी आशुतोष शंकर खारे या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आयुष शेंडे आणि सिद्धांत गोस्वामी यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून पोलिसांनी १६ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची बिस्किटे तसेच एक डीव्हीआर असा एकूण २ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाने आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. सध्या आरोपीला पुढील तपासासाठी बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.


नागपूर गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे घरफोडी

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button