Latest NewsMaharashtraNagpur

नागपुरात घरफोडी करणारा अट्टल आरोपी जेरबंद; २.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर: नागपूर शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल आरोपीला पाचपावली पोलीस ठाणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल २ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


२६ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळाभाऊ पेठ परिसरात घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी रोशन झिडू धमगाये यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्याची गाठी, नगदी रक्कम तसेच इतर साहित्य असा एकूण ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे ध्रुव राजेश बिरबल (वय २०, रा. टिमकी, नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीकडून पोलिसांनी नगदी रक्कम, चांदीची पायपेटी, रिअलमी कंपनीचा मोबाईल, चोरीस गेलेल्या दोन अॅक्टिव्हा दुचाकी तसेच हिरो एक्सट्रीम मोटारसायकल असा एकूण २ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासादरम्यान आरोपीने लकडगंज पोलीस ठाणे आणि कळमना पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरीचे गुन्हे केल्याचेही उघड झाले आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.


नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button