Latest NewsSocial NewsWashim

कामरगाव ग्रामगुरु मंदिरात श्रीमद भागवत सप्ताहाची भव्य सांगता, हजारो भाविकांचा महाप्रसाद

कामरगाव येथे असलेल्या पुरातन ग्रामगुरु मंदिर परिसरात ६१ व्या श्रीमद भागवत कथा व हरिनाम सप्ताह सोहळ्याची २८ फेब्रुवारी रोजी भव्य महाप्रसादाने सांगता करण्यात आली. हा भक्तिसोहळा प्रेमनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे महिलांच्या पंगतीमध्ये वाढण्याची जबाबदारी गावातील महिलांनीच सांभाळली. महिलांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत मोठे कौतुक होत आहे.

वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे भक्तीचा एक अनोखा सोहळा पाहायला मिळाला. गावातील पुरातन ग्रामगुरु मंदिर परिसरात ६१ व्या श्रीमद भागवत कथा व हरिनाम सप्ताह सोहळ्याची भव्य सांगता करण्यात आली. हा भक्तिसोहळा प्रेमनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. विशेष म्हणजे गावाबाहेर श्मशानभूमीच्या शेजारी असलेल्या या मंदिरातही भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण गावाने जात-पात आणि भेदभाव विसरून या सप्ताहात सहभाग घेतला. या सप्ताहात ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज गुल्हाणे यांच्या रसाळ वाणीतून भागवत कथेचे निरूपण करण्यात आले. सप्ताहाच्या सांगतेच्या दिवशी हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या पंगतीमध्ये वाढण्याचे काम महिलांनीच स्वतः हाती घेतले. माता-भगिनींना सन्मानाने प्रसाद मिळावा यासाठी महिलांनी केलेले हे नियोजन सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरले. पुरुषांनी इतर पंगतींचे व्यवस्थापन सांभाळत सेवाभावाने सहभाग घेतला. या भक्तिसोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button