Buldhanagold rateLatest News

सोन्याने पुन्हा 1.60 लाखांचा टप्पा ओलांडला; एका तोळ्यामागे 550 रुपयांची उसळी

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत. दरवाढ आणि घसरणीच्या या सत्रामुळे खरेदीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल आठवडाभराच्या वाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण झाली होती, त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा सोन्याच्या किंमतींनी जोरदार उसळी घेत 1.60 लाखांचा टप्पा पार केला आहे.

24 कॅरेट सोन्याचे आजचे दर

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा 550 रुपयांची वाढ झाली असून दर 1,61,570 रुपयांवर पोहोचले आहेत.

  • 8 ग्रॅमसाठी 440 रुपयांची वाढ; दर 1,29,256 रुपये
  • 10 तोळ्यांसाठी 5,500 रुपयांची वाढ

22 कॅरेट सोन्याचे दर

22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा 500 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या दर 1,48,100 रुपये आहेत.

  • 8 ग्रॅमसाठी 400 रुपयांची वाढ; दर 1,18,480 रुपये
  • 10 तोळ्यांसाठी 5,000 रुपयांची वाढ; दर 14,81,000 रुपये

18 कॅरेट सोन्याचे दर

18 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा 410 रुपयांची वाढ झाली असून दर 1,21,180 रुपये झाले आहेत.

  • 8 ग्रॅमसाठी 328 रुपयांची वाढ; दर 96,944 रुपये
  • 10 तोळ्यांसाठी 4,100 रुपयांची वाढ; दर 12,11,800 रुपये

खरेदीदारांमध्ये संभ्रम

सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. सध्या वाढलेल्या दरांमुळे अनेकांनी सोने खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयातील बदल यावर सोन्याचे दर अवलंबून राहणार आहेत.

दरातील चढ-उतार लक्षात घेता, गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी सावधगिरीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button