electionJalnaLatest NewsMaharashtrapolitics

धावडा ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल; प्रभाग रचना निश्चित

जालना : महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील धावडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच गावातील राजकीय वातावरण तापले आहे. शासनाच्या निर्देशानुसार २७ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रभाग रचना निश्चित करण्यात आली.

ही प्रक्रिया “घड्याळ काट्या” पद्धतीने पारदर्शक रीतीने पार पडली. यावेळी महसूल अधिकारी किशोर राजपूत आणि ग्रामविकास अधिकारी मदन अफोळकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना प्रभाग रचनेविषयी सविस्तर माहिती दिली. गावाची लोकसंख्या, भौगोलिक रचना आणि प्रशासकीय निकष लक्षात घेऊन प्रभाग निश्चित करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

बैठकीला इकबाल खान पठाण, माजी सरपंच बेलआप्पा पिसोळे, माजी सभापती प्रमोद कुलकर्णी, गंगुबाई बोराडे, सय्यद नूर, जुमान चाऊस, आयाज पठाण, नानासाहेब देशमुख, शंकर डोंगरे, परविन गांधीले, सोमनाथ घोडके, ज्ञानेश्वर आहेर, दीपक देवकर, अमोल देवकर, संतोष तबडे, दिलीप वाघ, मोतीलाल वैरी आणि सय्यद रशीद यांची उपस्थिती होती. सर्वांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि संयमाने पार पाडण्याची भूमिका व्यक्त केली.

तसेच पत्रकार मुस्तफा पठाण, मजहर पठाण आणि राजू शाह यांनी या प्रक्रियेचे वृत्तांकन केले.

ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचा कणा मानली जाते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी सक्षम नेतृत्व निवडणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली असून गावात निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button