Latest NewsMaharashtraNagpur

गिट्टीखदान (IBM रोड) परिसरात टाटा एएसमध्ये साप; सर्पमित्रांकडून सुरक्षित रेस्क्यू

नागपूरच्या गिट्टीखदान (IBM रोड) परिसरातून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. घरचे सामान शिफ्ट करत असताना एका टाटा एएस गाडीत अचानक साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. गाडीत बसलेले ३ तरुण आणि कुटुंबीय घाबरले होते. पण त्याच वेळी धावून आले सर्पमित्र शुभम जी.आर. पाहूया हा थरारक रेस्क्यू कसा पार पडला…


ही घटना दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली. कुटुंब घर बदलण्यासाठी टाटा एएस गाडीत सामान भरत असताना अचानक सापाच्या फुत्काराचा आवाज ऐकू आला. गाडीच्या आत हालचाल दिसताच गाडीत बसलेले ३ तरुण आणि कुटुंबीय दहशतीत आले.

घटनेची माहिती मिळताच वाईल्ड ॲनिमल्स अँड नेचर हेल्पिंग सोसायटी चे अध्यक्ष शुभम जी.आर. घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शांतपणे परिस्थितीचा आढावा घेत गाडीच्या गुंतागुंतीच्या भागात लपलेल्या सापाला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. त्यानंतर सापाला कोणतीही इजा न करता नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.


शुभम जी.आर. यांच्या धाडस आणि तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी अशा प्रसंगी तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा City News.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button