Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत गुन्हे शाखेची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ९ जण ताब्यात

अमरावती शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, अमरावती शहर पोलीस गुन्हे शाखा यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पाहूया सविस्तर वृत्त…


गुन्हे शाखेचे पथक फ्रेजरपुरा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. रवीनगर येथील रहिवासी पंकज ठाकरे हा न्यू कॉलनी, मंगलधाम परिसरात जुगार भरवत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ९ आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले.

पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे —

  • ₹५८,५०० रोख रक्कम
  • ₹१,१५,००० किमतीचे ७ मोबाईल फोन
  • ₹४,२०,००० किमतीच्या ६ मोटारसायकली

असा एकूण ₹५,९३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


अमरावती पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध जुगार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button