Crime NewsLatest NewsMaharashtraNagpur
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई; भारत नगर चौकातून रेती तस्कर जेरबंद

नागपूर प्रतिनिधी :
कळमना पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भारत नगर चौक परिसरात सापळा रचत अवैध रेती तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
पोलिसांना रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच तात्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान रुपेश शेलोकर आणि रामचंद्र बांडेबुचे (दोघेही रा. भंडारा) यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून तब्बल १२ ब्रास रेती आणि एक टिप्पर वाहन असा एकूण सुमारे १९ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या या अवैध रेती तस्करीवर पोलिसांनी मोठा आळा घातल्याचे सांगितले जात आहे.
आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कळमना पोलीस करत आहेत.



