AmravatiLatest NewsSocial News

विद्यापीठात संत गाडगे बाबा जयंती साजरी, जनरल मनोज पांडे यांच्याहस्ते हारार्पण

अमरावती : – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी माजी भारतीय सोना प्रमुख जनरल मनोज पांडे, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी मुख्य प्रशासकीय इमारत येथे संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन गाडगे बाबा यांना अभिवादन केले.

                विद्यापीठ परिसरात मुख्य प्रवेशव्दारासमोर असलेल्या श्री संत गाडगे बाबांच्या संदेश शिल्पाला कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी पुष्पार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे तसेच सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य, सर्व अधिष्ठाते, विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button