Latest NewsMaharashtraNagpur

नागपूरच्या गणेशपेठेत मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; इंस्टाग्रामवरील वादातून बारा तरुणांचा गोंधळ

नागपूर शहरातील गणेशपेठ परिसरात मध्यरात्री गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवरील वैयक्तिक वादातून हा गोंधळ झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत रात्री सुमारे सवा अकरा ते साडेअकरा दरम्यान घडली. गाडी गॅरेजजवळ काही तरुणांनी उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून इतर संबंधितांचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात सुमारे बारा तरुण घटनास्थळी जमल्याचं उघड झालं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन मित्र-मैत्रिणींमधील वैयक्तिक वाद इंस्टाग्रामवरून सुरू झाला. त्यानंतर हा वाद प्रत्यक्ष भेटीत गोंधळात परिवर्तित झाला आणि त्यातून वाहनांची तोडफोड झाली.

या घटनेत काही हिंदू तसेच काही मुस्लिम बांधवांच्या गाड्यांचं नुकसान झालं आहे. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की या घटनेला कोणताही धार्मिक रंग नाही. हा पूर्णपणे वैयक्तिक वाद असून त्याला धार्मिक स्वरूप देऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

“तिघेही अल्पवयीन असून काही जणांवर पूर्वी किरकोळ गुन्ह्यांची नोंद आहे. तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button