Latest NewsMaharashtraNandedSocial News

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अर्धापूर नगरपंचायतीची स्वच्छता मोहीम; कृतीतून अभिवादन

अर्धापूर, प्रतिनिधी :
अर्धापूर नगरपंचायतीच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. केवळ पुष्पहार अर्पण न करता स्वच्छतेची प्रत्यक्ष कृती करत नगरपंचायत कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी शहरात स्वच्छता अभियान राबवत समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला.

जयंतीनिमित्त शहरात विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शहरातील प्रमुख रस्ते आणि एसटी बसस्थानक परिसराची साफसफाई केली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

संत गाडगेबाबांनी आयुष्यभर स्वच्छतेचा आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचे अनुकरण करत जयंतीनिमित्त कृतीतून अभिवादन करण्याचा संकल्प करण्यात आला. “फक्त शाब्दिक अभिवादन न करता स्वच्छतेच्या माध्यमातून संत गाडगेबाबांना अभिवादन करू,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

या स्वच्छता अभियानामुळे शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी आणि नागरिकांनीही स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, असा उद्देश नगरपंचायतीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.


संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपत अर्धापूर नगरपंचायतीने राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात सकारात्मक संदेश पसरला आहे. अशा उपक्रमातून समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button