AmravatiHelth CareLatest News

दिवठाणा येथे गो. से. महाविद्यालयाच्या रा.से.यो.तर्फे आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकातर्फे दत्तक ग्राम दिवठाणा येथे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या अंतर्गत दुपारी तीन वाजता ग्रामस्थ व शिबिरार्थींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी खामगाव येथील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. शीतल भावेश चव्हाण तसेच प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ डॉ. नेहा बोबडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ. शितल भावेश चव्हाण यांनी ग्रामस्थांसह स्वयंसेवक व स्वयंसेविकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन केले. डॉ. नेहा बोबडे यांनी महिलांची व शिबिरार्थी विद्यार्थिनींची सखोल तपासणी करून आवश्यक पुढील चाचण्यांबाबत सल्ला दिला. तसेच आपल्या रुग्णालयात पुढील दोन भेटी विनामूल्य देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या आरोग्य शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी घेतला असून उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजाभिमुख कार्यातून ग्रामविकास व आरोग्य जनजागृतीचा संदेश देण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अढाऊ, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नीता बोचे व सहकार्यक्रमाधिकारी प्रा. उमेश खंदारे यांनी पथकाच्या वतीने मान्यवरांचे आभार व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी ओम वाकुडकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. दीक्षा खोडे, शिबिर गटप्रमुख  धनश्री पिवळटकर, शुभांगी हिवराळे , शितल तायडे, सुमेत गावंडे,  धनराज अहिर, ओम गिरे,  रोहित भोजने, व शिक्षकेतर कर्मचारी  यश मोरे यांनी आरोग्य शिबिराच्या व्यवस्थापनाकरिता अथक परिश्रम घेतले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर  यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. दादासाहेब बोबडे व सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे यांचे विशेष सहकार्य लाभले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button