Crime NewsLatest NewsNagpur

कत्तलीसाठी नेली जाणारी 5 गोवंशांची सुटका

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिसांनी अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या आरोपींवर मोठी कारवाई केली आहे. तांदुळवाणी गावाजवळ नाकाबंदी दरम्यान बोलेरो पिकअपमधून पाच जिवंत जनावरे निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

खापरखेडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तांदुळवाणी गावाजवळ सार्वजनिक रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी एमएच ४० सीटी ५७४२ क्रमांकाची महेंद्रा बोलेरो पिकअप थांबवून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये पाच जिवंत गोवंशीय जनावरे चारा-पाणी न देता निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळून आली. चालक राहुल योगेश केनेकर (वय ३०), शुभम कृष्णाजी रोहणकर (वय २७) दोघेही रा. वाकोडी, तसेच रमजान शकील कुरैशी (वय ३०, रा. खापा) यांना जनावरांबाबत कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून पाच गोवंशीय जनावरे, तीन मोबाईल फोन आणि महेंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण सुमारे १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर जनावरे जैन गौशाळेत सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार नामदेव टेकाम यांच्या तक्रारीवरून विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहेत.

गोवंशीय जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात खापरखेडा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राणी संरक्षण कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button