Accident NewsBhandaraLatest News

ओडिशामध्ये भीषण अपघात; झारसुगुडा येथे ५ पोलिसांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

ओडिशामध्ये रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून पाच पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना झारसुगुडा पोलिस ठाण्यासमोर घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कर्तव्यावर असलेले पोलिस बोलेरो वाहनातून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने त्यांच्या वाहनाला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बोलेरो वाहन पूर्णपणे चकनाचूर झाले. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या अपघातात काशीराम भोई, देबदत्त, निरंजन कुजूर, हवालदार लिंगराज धुरुआ आणि होमगार्ड भक्तबंधू मिर्धा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ओडिशा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, दोन सशस्त्र पोलीस (एपीआर) कर्मचारी आणि एका सार्जंटसह तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button