Amaravti GraminCrime NewsLatest News

अंजनगाव सुर्जीमध्ये शेतकऱ्यांच्या अवजारांवर डल्ला; चोरट्या टोळीचा पर्दाफाश

एक आरोपी अटकेत, दुसरा फरार; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

एक आरोपी अटकेत, दुसरा फरार; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

अंजनगाव सुर्जी, दि. — : अंजनगाव सुर्जी तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेती अवजारांची चोरी करणाऱ्या चोरट्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शेतातून लोखंडी नांगर चोरी

तालुक्यातील बोरागळा येथील शेतकरी विशाल चिकटे यांच्या शेतातून लोखंडी नांगर चोरीला गेल्याची तक्रार अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून डी.बी. पथकाला तपासासाठी रवाना केले.

तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद

तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी जवळा बु. येथील प्रशांत विनोद इंगोले (वय २६) याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने साथीदार धिरज गिरी याच्या मदतीने नांगर चोरी केल्याची कबुली दिली. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपीकडून पोलिसांनी पुढील मुद्देमाल जप्त केला आहे —
थोरात कंपनीचा लोखंडी नांगर – ४० हजार रुपये ESCORTS KUBOTA कंपनीचा ट्रॅक्टर – ४ लाख रुपये
रेडमी मोबाईल – १० हजार रुपयेएकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button