AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात ‘फिजिक्स ऑफ रेनफॉरेस्ट इकॉलॉजी’ विषयावर व्याख्यान संपन्न

अमरावती (दि. 20.02.2026) – विद्याथ्र्यांना भौतिकशास्त्राच्या पारंपरिक अभ्यासाबरोबरच पर्यावरण व परिसंस्था अभ्यासामधील भौतिकशास्त्राच्या आंतरशाखीय उपयोगांची ओळख व्हावी, या उद्देशाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात फिजिक्स क्लब अंतर्गत ‘फिजिक्स ऑफ रेनफॉरेस्ट इकॉलॉजी’ विषयावर नुकतेच विशेष व्याख्यान संपन्न झाले.
                डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील भौतिकशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख व प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ प्रा. डॉ. सुभाष बेहेरे यांनी वर्षावन परिसंस्थेच्या अभ्यासामध्ये भौतिकशास्त्राची भूमिका सोप्या आणि उदाहरणांसह स्पष्ट केली. ऊर्जा प्रवाह, ऊष्मागतिकी, द्रवगतिकी, किरणोत्सर्ग संतुलन, आर्द्रता चक्र, पर्जन्यमानाचे स्वरुप आणि जैवविविधतेचे वितरण या सर्व घटकांचा अभ्यास भौतिकशास्त्रीय तत्त्वांच्या साहाय्याने कसा करावा, आधुनिक वैज्ञानिक साधने, गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विश्लेषण यांचा वापर करून पर्यावरणीय बदलांचा अभ्यास कसा केला जातो, याबाबत विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणीय भौतिकशास्त्र आणि परिसंस्था संशोधनातील करिअर व संशोधनाच्या संधींबाबत विद्याथ्र्यांना हवामान बदल, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणीय संतुलन यांसारख्या जागतिक समस्यांच्या निराकरणामध्ये भौतिकशास्त्रज्ञांची भूमिका कशी महत्त्वाची आहे याविषयी व्याख्यानाच्या माध्यमातून महत्वाची माहिती मिळाली. विद्याथ्र्यांनी आंतरशाखीय संशोधन क्षेत्रांकडे वळावे आणि भौतिकशास्त्राच्या ज्ञानाचा समाजोपयोगी संशोधनासाठी उपयोग करावा, असे आवाहन याप्रसंगी व्याख्याते डॉ. बेहरे यांनी विद्याथ्र्यांना केले. यावेळी डॉ. बेहरे यांनी विद्याथ्र्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
                 प्रास्ताविकेतून विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे यांनी व्याख्यानाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली.  आभार फिजिक्स क्लबचा अध्यक्ष व एम.एस्सी. भाग-2 चा विद्यार्थी आदित्य प्रधान याने मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button