AmravatiLatest News

विद्यापीठाच्या पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत

अमरावती (दि.19.02.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्या कु. कल्याणी सांगुनवेढे प्रथम, कु. समा लिवा द्वितीय, मो. लाईक व अंकित चौबे तृतीय या विद्याथ्र्यांनी परीक्षेत उत्तुंग भरारी घेत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
कु. कल्याणी सांगुनवेढे हिने विद्यापीठाच्या उन्हाळी-2025 एम.पी.एड्. परीक्षेत 3200 पैकी 2932 गुण मिळवून सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे. तसेच तिने नेट (पीएच.डी) जून व डिसेंबर-2025 उत्तीर्ण केली आहे. विद्याथ्र्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बरहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत यांनी विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय विभागातील सर्व शिक्षकवृंदांना देतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button