Education NewsLatest NewsWashim

वाशिम : बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी प्रकरण; २७ शिक्षक-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

वाशिम जिल्ह्यात बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी झाल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरवेळी गंभीर अनियमितता आढळून आल्याने तब्बल २७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माहितीनुसार, ‘टो’ येथील मैनागीरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावीच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात सामूहिक कॉपी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या भरारी पथकाने परीक्षा केंद्रावर अचानक तपासणी धाड टाकली.

तपासणीदरम्यान परीक्षा केंद्रावर गंभीर अनियमितता आढळून आल्याचे सांगण्यात आले. पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वाशिम ग्रामीण पोलीस ठाणे येथे २६ शिक्षक आणि एका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यावर संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासानंतर संबंधित शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button