Latest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळ माईंदे चौक परिसरात इमारतीवर इसमाचा मृतदेह फाशीच्या अवस्थेत आढळला; आत्महत्या की घातपात? पोलिस तपास सुरू

यवतमाळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील माईंदे चौक परिसरातील एका इमारतीवर एका इसमाचा मृतदेह फाशीच्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना आत्महत्येची आहे की घातपाताचा प्रकार आहे, याबाबत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना संबंधित इमारतीवर एक इसम फाशीवर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ अवधूतवाडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून स्थानिक नागरिकांकडूनही चौकशी केली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या घटनेमुळे माईंदे चौक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button