Crime NewsLatest NewsNagpur

नागपूर : सदर पोलीस स्टेशन ची मोठी कामगिरी; ६५ हरवलेले-चोरीचे मोबाईल शोधून काढले

नागपूर शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सदर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या दोन महिन्यांत हरवलेले आणि चोरीला गेलेले तब्बल ६५ मोबाईल फोन पोलिसांनी शोधून काढले आहेत. विशेष म्हणजे काही मोबाईल राज्याबाहेर गेलेले असतानाही तांत्रिक तपासाच्या मदतीने ते परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

राज्याबाहेर गेलेले मोबाईलही परत

सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या हरवलेल्या व चोरीच्या मोबाईल प्रकरणांचा सखोल तपास करण्यात आला. या कारवाईत एकूण ६५ मोबाईल फोन रिकव्हर करण्यात आले. यातील काही मोबाईल पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये वापरात असल्याचे तपासात आढळले.

तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तपास पथकाने संबंधित मोबाईलचा मागोवा घेत ते परत मिळवले. या मोहिमेत पोलीस कॉन्स्टेबल अंकित ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

CEIR पोर्टलचा प्रभावी वापर

मोबाईल शोधण्यासाठी Central Equipment Identity Register (CEIR) या पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला. हे पोर्टल भारत सरकारच्या दूरसंचार विभागांतर्गत कार्यरत असून, चोरीला गेलेल्या मोबाईलमध्ये इतर सिमकार्ड वापरले गेल्यास त्याची माहिती CEIR प्रणालीद्वारे पोलिसांना मिळते. त्याआधारे संबंधित मोबाईलचा मागोवा घेता येतो.

मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी तात्काळ सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी तसेच CEIR पोर्टलवर आवश्यक माहिती भरावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button