AmravatiHelth CareLatest News

विद्यापीठात ‘फिट इंडिया – संडेज ऑन सायकल’ अभियानांतर्गत झुंबा व योग कार्यक्रम उत्साहात साजरा

अमरावती (दि. 16.02.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने ‘फिट इंडिया – संडेज ऑन सायकल’ अभियानांतर्गत झुंबा व योग कार्यक्रम मोठ¬ा उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिक तसेच विद्याथ्र्यांमध्ये शारीरिक सुदृढता, जागरुकता निर्माण व्हावी, नियमित व्यायामाची सवय लागावी, या उद्देशाने सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध विभागांतील विद्यार्थी तसेच मॉर्निंग वॉकर्स मोठ¬ा संख्येने सहभागी झाले होते.

               सहभागी विद्यार्थी व मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक करीत अशा आरोग्यवर्धक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमात विभागातील विद्यार्थी संदीप गावंडे, अनुष्का भालमे, मनिता गुरूंग यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिक दिले. शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. अतुल बिजवे, डॉ. विजय निमकर, कु. सविता बावनथडे, डॉ. निलेश इंगोले, डॉ. सौरभ त्रिपाठी, गजानन उंबरकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button