विद्यापीठाची हिवाळी-2025 बी.ए. सेमि.-3 (एन.ई.पी.) अभ्यासक्रमाच्या परीक्षेत बदल ..विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती (दि.16.02.2026) – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची हिवाळी – 2025 बी.ए. सेमि.-3 (एन.ई.पी.) अभ्यासक्रमातील मेजर – 4 अंतर्गत ‘अॅनॉटॉमी व सायकॉलॉजी इन योगा’ हा विषय नव्याने परीक्षा योजनेत समाविष्य करण्यात आल्याने सदर विषयाच्या परीक्षेत बदल करण्यात येत असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (केंद्र क्र. 205) या महाविद्यालयातील विद्याथ्र्यांची परीक्षा श्रीमती आर.डी.जी. महिला महाविद्यालय, अकोला (केंद्र क्र. 207) ऐवजी श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. तसेच बी.एस. पाटील महाविद्यालय, परतवाडा (केंद्र क्र. 117) आणि स्व. सी.एम.कढी कला व वाणिज्य महाविद्यालय, अचलपूर कॅम्प (केंद्र क्र. 142) या दोन्ही महाविद्यालयातील विद्याथ्र्यांची परीक्षा बी.एस. पाटील महाविद्यालय, परतवाडा (केंद्र क्र. 117) ऐवजी विद्याभारती महाविद्यालय, अमरावती (केद्र क्र. 126) या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.
यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राव्दारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, वेळापत्रक व परीक्षा केंद्रात झालेला बदल लक्षात घेऊन सर्व विद्याथ्र्यांना माहिती करुन द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.



