विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात ‘मेनी व्हॉईसेस, वन सायन्स’ विषयावर ग्लोबल विमेन्स ब्रोकफास्ट – 2026 कार्यक्रम उत्साहात संपन्न

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग व मुलींचे वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने व इंडियन वुमन सायंटिस्टस् असोसिएशन, अमरावती शाखेच्या सहकार्याने आणि असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स, मुंबई यांच्या प्रोत्साहनातून आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र संघटना प्रेरित ‘मेनी व्हॉईसेस, वन सायन्स’ या विषयावर ग्लोबल विमेन्स ब्रोकफास्ट – 2026 कार्यक्रम मोठ¬ा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मनिषा कोडापे, प्रमुख वक्ते म्हणून हैदराबाद येथील आयआयसीटीच्या प्रिन्सिपल सायंटिस्ट डॉ. वसुंधरा मुत्ता, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कुल ऑफ केमिकल सायन्सेसच्या संचालक डॉ. संगिता माकोने, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत गावंडे व माजी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद अस्वार यांची उपस्थिती होती.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कुल ऑफ केमिकल सायन्सेसच्या संचालक डॉ. संगिता माकोने यांनी विषयाची मांडणी करतांना आजच्या काळात मुलींनी विज्ञान क्षेत्रात पुढे येणे आवश्यक असल्याचे सांगितले. हैदराबाद येथील आयआयसीटीच्या प्रिन्सिपल सायंटिस्ट डॉ. वसुंधरा मुत्ता यांनी ‘फंक्शनल नॅनोमटेरियल्स फॉर अ सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावर व्याख्यान देतांना कार्यक्षम नॅनोमटेरियल्सच्या माध्यमातून शाश्वत विकास व जागतिक समस्यांवरील उपायांची सविस्तर माहिती दिली. माजी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद अस्वार म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग आवश्यक आहे. महिलांनी प्रगती केली तर राष्ट्राची प्रगती होते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत गावंडे यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले.
अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, अशा कार्यक्रमांमुळे सहकार्याची भावना वाढीस लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी यातून प्रेरणा मिळत असल्याचे सांगून उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रास्ताविक डॉ. जागृती बारब्दे, स्वागतपर भाषण राष्ट्रीय समन्वयक डॉ. विजेंद्र सिंह, पाहुण्यांचा परिचय श्री शुभम क-हाडे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन कु. प्रांजली चव्हाण, तर आभार श्रावणी ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दोनशेहून अधिक सहभागींनी नोंदणी केली होती. कार्यक्रमाला शिक्षक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संबंधित प्रतिनिधी, वसतिगृहातील विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील संशोधक, वैष्णवी बंड, आरती कुंभारे, श्री शुभम क-हाडे, विद्यार्थी हकीम नौशाद, सुमित लोणे, श्रेया चौहान, नफिसा आणि प्रांजली चौहान यांनी विशेष परिश्रम घेतले.



