AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागात ‘ड्रॅगनफ्लाय’ व ‘कॅमेरा ट्रॅपिंग’ विषयावर व्याख्यान संपन्न

अमरावती :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागामध्ये ‘ड्रॅगनफ्लाय’ व ‘कॅमेरा ट्रॅपिंग‘ विषयावर नुकतेच व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख़ डॉ. एच.पी. नांदुरकर उपस्थित होत्या.
               व्याख्याते डॉ. पवन राठोड, महसूल अधिकारी, अमरावती यांनी ड्रॅगनफ्लाय यावर व्याख्यान देतांना ड्रॅगनफ्लाय हे एक प्रकारचे किटक असल्याचे सांगून डासांसारख्या किटकांचे भक्षण करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करीत असल्याचे सांगितले. ड्रॅगनफ्लायच्या प्रजननाविषयी देखील त्यांनी विद्याथ्र्यांना सविस्तर माहिती दिली. ड्रॅगनफ्लायच्या जगभरात सहा हजाराहून अधिक प्रजाती आढळून येतात आणि त्या त्या परिसरातील पर्यावरणाची गुणवत्ता देखील त्यांच्या उपस्थितीवरुन ओळखता येत असल्याचे सांगून जैवविविधता संवर्धनासाठी त्यांचे खूप महत्व असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी व्याख्यात्यांनी ड्रॅगनफ्लायची काही छायाचित्रे सुध्दा विद्याथ्र्यांना दाखविली. त्यामुळे विद्याथ्र्यांनाही विषयाची चांगली माहिती झाली.
                कॅमेरा ट्रॅपिंग या विषयावर व्याख्यान देतांना वन्यजीव संशोधक पंकज बांडाबुचे यांनी कॅमेरा ट्रॅप म्हणजे काय, त्याची कार्य पध्दती आदींबाबत माहिती दिली. वसाहतींमध्ये वाघ अथवा बिबट यासारख्या वन्य प्राण्यांची सुटका करणे, संख्या मोजणे, वर्तनाचा अभ्यास करणे, प्रजातींची नोंद ठेवणे, संवर्धनासाठी नियोजन यामध्ये कॅमेरा ट्रॅपिंगचे महत्व, कॅमेरा बसविण्याची योग्य पध्दत, ठिकाणे, डेटा संकलन आदींविषयी त्यांनी विद्याथ्र्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष कॅमेरामधून घेतलेली छायाचित्रे सुध्दा विद्याथ्र्यांना दाखविली.
आभार प्रदर्शनाने व्याख्यान कार्यक्रमाची सांगता झाली. दोन्ही व्याख्यान कार्यक्रमाला विभागातील डॉ. नागले, डॉ. रजनी तायडे, डॉ. सीमा सावळे, अंकिता पानसरे, संपदा जोशी, निधी बजाज, विनय झटाले, रचना धुरे तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button