‘मी त्याच्यासोबत फ्लर्ट केलं अन् त्याने…’; अक्षय खन्नाबद्दल कंगनाचा ‘तो’ धक्कादायक खुलासा, जुना Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई: बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ आणि विद्यमान खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच आपल्या परखड विधानांमुळे चर्चेत असते. मात्र, सध्या कंगनाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ अक्षय खन्ना (Akshaye Khanna) बद्दल एक मजेशीर आणि रंजक खुलासा केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सध्या सोशल मीडियावर एका जुन्या टेलिव्हिजन मुलाखतीचा भाग मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा किस्सा २०१० मधील ‘नो प्रॉब्लेम’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. यावेळी कंगनासोबत अभिनेता अनिल कपूर आणि संजय दत्त देखील उपस्थित होते. गप्पांच्या ओघात कंगनाने अक्षय खन्नासोबतचा एक वैयक्तिक अनुभव शेअर केला.
“मी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण…”
कंगनाने या मुलाखतीत हसत हसत सांगितले की, तिने अक्षय खन्नाशी जवळीक वाढवण्याचा आणि संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. कंगना म्हणाली,
“मी अक्षयसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला अजिबात दाद दिली नाही. तो फारसा प्रतिसाद देत नाही आणि आपल्याच धुंदीत असतो.”
कंगनाच्या या विधानावर तिथे उपस्थित असलेल्या अनिल कपूर आणि संजय दत्त यांनाही हसू अनावर झाले होते.
अक्षय खन्नाचा अबोल स्वभाव
बॉलिवूडमध्ये अक्षय खन्ना हा अत्यंत शांत, कमी बोलणारा आणि प्रसिद्धीपासून दूर राहणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. कंगनाने पुढे असेही नमूद केले की, अक्षय सहसा कोणाशी जास्त बोलत नाही, मात्र अनिल कपूरशी त्याचे चांगले जमते. यावर अनिल कपूरनेही हलक्या-फुलक्या अंदाजात प्रतिक्रिया देत वातावरणात रंगत आणली होती.
अक्षय खन्ना पुन्हा चर्चेत येण्याचे कारण
अक्षय खन्ना सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आला आहे. त्याच्या अभिनयाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत असून, अनेक जुन्या अभिनेत्रींनीही मुलाखतींमध्ये अक्षय हा त्यांचा ‘क्रश’ असल्याचे कबूल केले आहे.



