अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल महिला स्पर्धा , तिसऱ्या दिवशी अटीतटीच्या सामन्यात विजयी संघाची सलामी

अमरावती ( दि. 08/02/2026):- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे सुरू झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्ट बॉल महिला स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करून विजयी संघाने विजय मिळवला. त्यामध्ये आज झालेल्या सामन्यात संजीवनी विद्यापीठ कोपरगाव विरुद्ध एच. एन. जी. विद्यापीठ पाटण यांच्यात झालेला सामना सहजपणे पाटण विद्यापीठाने जिंकला. आग्रा विद्यापीठ वर्सेस कानपूर विद्यापीठ यामधील झालेला सामना आग्रा विद्यापीठाने मोठ्या फरकाने जिंकला. कालिकात विद्यापीठ विरुद्ध गोंडवाना विद्यापीठ यांच्यातील सामना कालिकतने एकतर्फी जिंकला. आंध्र विद्यापीठ विरुद्ध बरकतुल्ला विद्यापीठ भोपाळ यांच्यात झालेला सामना बरकतुल्ला विद्यापीठाने एकतर्फी जिंकला. एम. एल. एस. यु. उदयपूर विरुद्ध व्ही. टी. यु. विद्यापीठ कर्नाटक यांच्यातील सुद्धा सामना उदयपूरने एकतर्फी जिंकला. एम.डी.एस. यू. अजमेर विरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्यात झालेला सामना अजमेर संघाने जिंकला.
भारती विद्यापीठ, पुणे विरुद्ध कुवेम्पु विद्यापीठ कर्नाटक यांच्यात झालेला अटीतटीचा सामना कर्नाटकने जिंकला. कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विरुद्ध दिल्ली विद्यापीठ यांच्यात झालेला सामना जळगावने एकतर्फी जिंकला. एच. वाय. व्ही. दुर्ग विद्यापीठ विरुद्ध केरळ विद्यापीठ यांच्यातील सामना दुर्ग विद्यापीठ ने जिंकला. जी. एन. डी. यू. अमृतसर विरुद्ध पुणे विद्यापीठातील सामना अमृतसरने जिंकला.
पंजाब विद्यापीठ चंदीगड विरुद्ध एम. जी. यु. नालागोंडा विद्यापीठ यांच्यातील झालेला सामना पंजाब विद्यापीठाने एकतर्फी जिंकला. भारती विद्यापीठ पुणे विरुद्ध कोइंबतूर विद्यापीठ शिमोगा विरुद्ध झालेला सामना कोइंबतूर विद्यापीठाने जिंकला. उद्या लीग मॅच होणार असून उद्या होणारे सामने सुद्धा बलाढ्य संघामध्ये होणार आहेत. दहा तारखेला अंतिम सामने होणार असून त्यामधून प्रथम द्वितीय व तृतीय स्थान निश्चित होणार आहे.



